नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, 3 दुचाकी जाळण्याचा प्रयत्न

0
1195

नाशिक: नाशिकच्या सिडको परिसरात आज पुन्हा एकदा जळीतकांड पहायला मिळालं. कामतवाडा परिसरात अज्ञात इसमांकडून 3 दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात धक्कादायक प्रकार म्हणजे अज्ञात व्यक्तींनी कामतवाडा परिसरातील राकेश दळवी यांचं घरही जाळण्याचा प्रयत्न केला.

 

या हल्ल्यात रमेश आणि त्यांची पत्नी शोभा दळवी जखमी झाले आहेत. याचवेळी दळवी दाम्पत्याच्या शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे त्यांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे.

 

आतापर्यंत नाशिकमध्ये अनेक वेळा दुचाकी जाळण्याचे प्रकार घडले आहेत. पण पहिल्यांदाच हल्लेखोरांकडून एखाद्या व्यक्तीचं घर जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

SOURCEabplive.in
SHARE
Previous articleAdira to Aaradhya: 36 most interesting celebrity baby names and their meanings
NasikNews provide extensive news coverage through our Web site, which is frequently updated with the latest news related to Politics, Business, Social, Sports, Entertainment, Technology etc. The day's feature stories are constantly refreshed and updated. Events, photos, videos and current happening's in Nasik City.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

2 × five =